Last Updated on December 9, 2022 by Jyoti S.
Nashik: ना पोलिसांकडून कारवाई, ना महापालिकेकडून जप्ती
Nashik, ता. ८ फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असताना, या फुटपाथवर मात्र दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग केली जात आहे. तर काही ठिकाणी फुटपायलगत असलेल्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करोत दुकाने थाटली आहे. यामुळे ज्यांच्यासाठी फुटपाथ उभारला. ते लोक मात्र आता पुन्हा नेहमीप्रमाणेच रस्त्यावरूनच चालत असल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळते आहे. त्यामुळे फुटपाथ नेमका कोणासाठी, पादचाऱ्यांसाठी की वाहनाच्या पार्किंगसाठी की व्यावसायिकांची सोय व्हावी म्हणून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.फुटपाथवरच वाहनांची पार्किंग केली जाते आहे. हे सीबीएस (Nashik)रस्त्यावरील दृश्य आहे आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
शहरात त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ (Nashik)या मागाँवर स्मार्ट रोड उभारला आहे. या स्मार्ट रोडला भव्य फुटपाथ बांधला आहे. या फुटपाथमुळे पादचारी नागरिक, विद्यार्थी, तसेच ज्येष्ठांना पायी चालणे सुलभ व्हावे असा त्या फुटपाथचा उद्देश होता. परंतु दुर्दैवाने पादचाऱ्यांना फुटपाथचा वापर करण्याऐवजी रस्त्यावरूनच चालत जावे लागते आहे. फुटपाथवर ठिकठिकाणी दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते.

अनधिकृत पार्किंगसह व्यावसायिकांनीही अतिक्रमण केले आहे.त्याचमुळे पादचाऱ्यांना आता चालताना अडथळे निर्माण केले जात आहेत. स्मार्ट रोडवरील(Nashik) जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय त अशोक स्तंभापर्यंतच्या फुटपाथवर सर्रास दुचाकींचे पार्किंग केले जाते. तर या फुटपाथलगत असलेल्या सायकल आणि ट्रॅकवर चारचाकी चालकांनी त्यांच्या कार पार्क केल्या.
agricultural: कृषी महोत्सवात सव्वा कोटीची उलाढाल
अनेकांनी चहाच्या टपन्या थाटल्या आहेत(Nashik). तर, आता अशोक स्तंभपर्यंतच्या फुटपाथवर तर आता वडापाव विक्रेत्यांसह व्यावसायिकानी त्यांच्या साहित्यांनी अतिक्रमण केले आहे. काही खासगी आस्थापनांनी फुटपाथवर अतिक्रमणच केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना या फुटपाथवरून चालणे कठीण होत चालले आहे . म्हणूनच यावर तात्काळ कारवाई करावी अशी ग्रामस्थानी मागणी केली आहे.