Last Updated on December 12, 2022 by Jyoti S.
nashik : राज्यस्तरीय योग संमेलनातील ठरावांसाठी पाठपुरावा
नाशिक(Nashik ) योगोत्सव या राज्यस्तरीय योग संमेलनाप्रसंगी रविवारी ठराव मांडताना पदाधिकारी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) योगविषयाला ऐकि म्हणून मान्यता द्यावी. शाळा, मध्ये योग विषयाला मुख्य विषय म्हणून स्थान मिळावे अन्य विविध बारा ठराव योगोत्सवात मांडण्यात आले. शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.या पहिल्या राज्यस्तरीय योग्य संमेलनाचा रविवारी (ता.११)समारोप झाला.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पंचवटी(Nashik) येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम येथे योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित योग शिक्षक संघातर्फे पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले होते. डॉ.मनोज निलपवार यांनी बारा ठराव मांडतांना ते शासन दरबारी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी, राहुल येवला, अमित मिश्रा, संमेलनाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी राज्यभरातून १५५ स्पर्धक सहभागी

विशाल जाधव, डॉ. प्रज्ञा पाटील, दीपाली लामघाडे, डॉ. प्रीती त्रिवेदी झाले होते.संमेलनात मांडलेले ठराव असे एमपीएससीसह आरोग्यवर्धिनीमार्फत योग सत्र आणि योगशिक्षकास नियमित करताना मानधन वाढवावे. शासकीय, निमशासकीय आस्थापनांमध्ये योग ब्रेक नियमित करावा. याकरिता एक तज्ज्ञ योगशिक्षक नेमावा. योग विषयाला सेट परीक्षेत समाविष्ट करावे. महाराष्ट्र पोलिस खात्यात योगशिक्षक नियमित करावा.Nashik Date -8 : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी?
जिल्हा सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्ट जागा भराव्यात. ग्रामीण व शहरी भागातील वीस वर्षांपासून निःशुल्क सेवा देणाऱ्या योग शिक्षकास लोक कलावंताप्रमाणे मानधन द्यावे. योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे. योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी. मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनातर्फे आयोजित करावे योगशास्त्रातील पदवीधर, उच्च शिक्षित योग शिक्षकांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा. हे ठराव यावेळी मांडले.