नाशिकचा ‘कॅलिफोर्निया’ गुलाबी थंडीने गारठला !

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

निफाड 7.4, नाशिक 9.8 अंश सेल्सिअस

वातावरणातील बदलांनी या वर्षी सर्वाधिक काळ गारव्याची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या थंडीने नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात नीचांकी पातळीची नोंद केली. दरवर्षी सर्वात कमी तापमान सर्वसाधारणपणे जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात नोंदले जाते. यंदा नोव्हेंबरमध्येच ही • पातळी गाठली गेल्याने हंगाम संपुष्टात येईपर्यंत म्हणजे किमान दीड ते दोन महिने हिवाळ्याचा आस्वाद घेता येईल, अशी स्थिती आहे.

नाशिक : जिल्ह्याचा कॅलिफोर्निया आणि द्राक्ष पंढरी असलेला निफाड तालुका सध्या गुलाबी थंडीने गारठला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड येथे खाली होत असून, रविवारी (दि.20) सकाळी महाबळेश‍ हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाचा पारा येथे 7.4 अंश सेल्सिअस नोंदवला गेला शिक्काम आहे, तर नाशिकचा पारा 9.8 अंशांपर्यंत
खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील महाबळेश्वरप्रमाणे थंड हवेचे ठिकाण या आपल्या ओळखीवर नाशिकने पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.

र्वत्र भरलेला प्रचंड गारवा.. दिवसा बोचणारा थंडगार वारा आणि त्यापासून बचावासाठी चाललेली धडपड खरेतर नाशिककरांसाठी हे काही नवीन नाही.एरवी, तापमान कमी होणे आणि थंडीची लाट येणे यांची नाशिककरांना आता सवय झाली आहे. दरवर्षी जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यांत तापमान या पातळीवर जात असते. सवय तथापि, अनेक वर्षांनंतर नोव्हेंबर महिन्यात प्रथमच पारा 7.4 अंश सेल्सिअस इतका खाली घसरला आहे. त्यामुळे वातावरणाचा बदललेला हा नूर नववर्ष स्वागताच्या तयारीत उत्साह भरणारा आहे. दिवाळीनंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची वाटचाल कंपनीचे नेहमीप्रमाणे थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यात तिचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. पण, यंदा नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच तिचे अस्तित्व जाणवू लागले आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून जाणारे तापमानात सातत्याने घट होते असून, शुक्रवारी (दि.18) नाशिकचा पारा 11.2, तर निफाड़ 8.30 अंश सेल्सिअस होता. शनिवारी (दि. 19) पुन्हा घट होत पारा 10.4 व 8.1 आला, तर रविवारी नाशिकचा पारा 9.8 व निफाड 7.4 अंश सेल्सिअस नोंदवला गेला.

त्यामुळे मागील काही दिवसांचा विचार करता किमान तापमानाचा पारा सतत चढता आणि कमाल तपमानाचा पारा उतरताच होता. यामुळे नाशिककरांना थंडीची खूप तीव्रता अनुभवयास येत आहे. त्यामुळे नोंव्हेबर अखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असे दिसू लागले आहे. महाबळेश्वरपेक्षाही नाशिक अधिक थंड होत असल्याचे दिसत आहे. हेही वाचा:नाशकात ६ डिसेंबरपासून कृषी महोत्सव