
Last Updated on August 15, 2023 by Jyoti Shinde
Petrol disel LPG rates: पहा आजचे रेट्स
थोडं पण महत्वाचं
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये दर समान आहेत. या दरम्यान, केंद्र सरकारने आता सरकारी तेल कंपन्यांना मोठा झटका दिलेला आहे. यावेळी सरकारने विंडफॉल टॅक्स वाढवण्याची मोठी घोषणा केलेली आहे.
याबाबतची माहिती, सरकारने अधिसूचना जारी केली आहे. डिझेल आणि कच्च्या तेलाच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. यासोबतच जेट इंधनाच्या निर्यातीवरील कर मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.Petrol disel LPG rates
एका सरकारी अधिसूचनेनुसार, देशात उत्पादित कच्च्या तेलावर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) च्या स्वरूपात आकारला जाणारा कर 4,250 रुपये प्रति टन वरून 7,100 रुपये प्रति टन करण्यात आला आहे. डिझेल निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 1 रुपये प्रति लिटरवरून 5.50 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.
15 ऑगस्टपासून जेट इंधन किंवा एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर 2 रुपये शुल्क आकारले जाईल. यापूर्वी विमान इंधनावर विशेष उत्पादन शुल्क लागत नव्हते. पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क शून्य राहील. नवे कर दर मंगळवारपासून लागू होणार आहेत. भारताने गेल्या वर्षी 1 जुलै 2022 रोजी प्रथमच विंडफॉल प्रॉफिट टॅक्स लागू केला आणि ऊर्जा कंपन्यांच्या असाधारण नफ्यावर कर लावणाऱ्या देशांच्या वाढत्या संख्येत सामील झाला.Petrol disel LPG rates
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कशा होत्या? दर पंधरवड्याला तेलाच्या सरासरी किमतींच्या आधारे कर दरांचे पुनरावलोकन केले जाते. जागतिक कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल US$75 पेक्षा जास्त असल्यास, देशांतर्गत कच्च्या तेलावर विंडफॉल कर आकारला जातो. ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 86.8 डॉलर होती.
Comments are closed.