Last Updated on December 21, 2022 by Jyoti S.
Auction: मेथी अवघी ५ रुपये जुडी; शेतकरी झाले हवालदिल आवक वाढली : लिलावात दर घसरले
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीला भाव(Auction) नसल्याने मंगळवारी (दि.२०) सायंकाळी लिलाव प्रक्रियेत पाचशे रुपये शेकडा दराने विक्री झाल्याने उत्पादन खर्च, दळणवळणाचे भाडे न सुटल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आला आहे.
सोमवारी (दि.१९) मेथी जुडीला १३ रुपये पर्यंत प्रति जुडीला असा भाव नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला होता. मात्र मंगळवारी सायंकाळी ५ रुपये प्रति जुडी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते . स्थानिक बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाहेरगावी शेतमाल जात नाही त्यामुळे शेतमालाला भाव नसल्याने बाजारभाव खूपच प्रमाणात घसरले असल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी माहिती सांगितले. कधी ५० ते ६० रुपये प्रति जुडी मजल मारणाऱ्या मेथी भाजीचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरल्याने एकीकडे मोठ्या सानखेने शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच दुसरीकडे पालेभाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांनी सुद्धा आपले समाधान व्यक्त केले आहे.हेही वाचा: Viticulture : द्राक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
पुरवठा वाढला आहे
बाजार समितीत अचानक मेथीचा पुरवठा(Auction) खूपच प्रमाणात वाढला आहे . यामुळे सोमवारी १३ रुपये प्रती जुडी असा गेलेला भाव मंगळवारी मात्र खूपच कमी झाला . मेथीच्या जुडीला अवघे ५ रुपये असा भाव मिळाला आहे .
स्थानिक उत्पादन मोठ्या प्रमाणात वेगाने होऊ लागल्याने पालेभाज्यांची मालाची आवक वाढली आहे. त्याचमुळे बाहेरील बाजारपेठेत मालाचा होणारा हा खूपच कमी झाला आहे.