खूशखबर! नाशिक- बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू

Last Updated on November 25, 2022 by Taluka Post

येत्या ३ फेब्रुवारीपासून स्टार एअरची सेवा सुरू होणार

नाशिक : स्टार एअरने नाशिक- बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. येत्या ३ फेब्रुवारीपासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली.

भुजबळ यांनी नुकतीच ना. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उडान योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, दि. ३ फेब्रुवारी पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी नाशिक-बेळगाव विमानसेवा देणार आहे. तसेच, दुसऱ्या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत

अशी असेलं विमानसेवा

एस ५, १४५ ही फ्लाइट बेळगावहून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता निघून नाशिक येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. तसेच रविवारी सायंकाळी ५.०५ वाजता सुटून सायंकाळी ६.०५ वाजता नाशिकला पोहोचेल. तर एस ५, १४६ ही फ्लाइट नाशिकहून शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता निघून ११.४५ ला बेळगाव येथे पोहोचेल, तसेच रविवारी सायंकाळी ६.३० वाजता निघून सायंकाळी ७.३० वाजता बेळगावला पोहोचेल. मार्गावर ५० सीटर एम्ब्रेअर १४५ विमाने धावणार.हेही वाचा: नाशिक-मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण केव्हा?