Surat-Chennai Greenfield: नाशिक तालुक्यातील गावांची अधिसूचना

Last Updated on January 4, 2023 by Jyoti S.

Surat-Chennai Greenfield: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्प

नाशिक केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड दिंडोरीनंतर नाशिक तालुक्यातील गावांची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील तीन गावांमधील ३९ गटांसाठीची ही अधिसूचना आहे. भारतमाला योजनेंतर्गत

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड(Surat-Chennai Greenfield) प्रकल्प उभारण्यात येत आहे. एकूण १ हजार २७० किलोमीटरच्या या महामार्गात नाशिक जिल्ह्यातील १२२ किलोमीटरचा समावेश असणार आहे. सहा तालुक्यांतील जमीन त्यासाठी अधिग्रहित केली जाईल.

त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्राधिकरणाने शुक्रवारी (दि. ३०) दिंडोरी तालुक्यातील गावांची अधिसूचना घोषित केली. त्यापाठोपाठ शनिवारी (दि. ३१) नाशिक तालुक्यातील तीन गावांमधील ३९ गटांसाठीची अधिसूचना काढण्यात आली आहे.

तालुक्यातील आडगाव, लाखलगाव तसेच ओढा या तीन गावांमधील एकूण १४.९८३९ हेक्टर क्षेत्रासाठीची ही अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत या गटांबाबत काही हरकत व आक्षेप असल्यास उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प नाशिक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात, असे प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: सुरत – चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी

नाशिक- सुरत पावणेदोन तास

ग्रीनफिल्डमुळे नाशिक-सुरत(Surat-Chennai Greenfield) अंतर अवघ्या १७६ किलोमीटरवर येणार असून, प्रवासाचा कालावधी पावणेदोन तासांवर येणार आहे. प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या सहा तालुक्यांतील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे.