Last Updated on December 12, 2022 by Jyoti S.
Mercury: नाशिकचे किमान तापमानात वाढ, पोचला १२.६ अंशांवर

नाशिक, ता. ११ कधी कडाक्याची थंडी.. तर अचानक गायब होणारी थंडी. अशा वातावरणीय बदलाचा अजब प्रकार नाशिककर सध्या अनुभवत आहेत. शनिवारी (ता. १०) नाशिकचे किमान तापमान(Mercury) १०.४ अंशापर्यंत खालावले असताना, रविवारी (ता. ११) तब्बल दोन अंशांहून अधिक वाढ होत किमान तापमान १२.६ अंश सेल्सीअस नोंदविले आहे.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात कडाक्याची थंडी जाणवल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झालेली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा(Mercury) जोर पुन्हा वाढलेला असताना, नाशिकचे किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर किमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. त्यातच रविवारी पुन्हा वातावरणातून थंडी गायब झाल्याची अनुभूती नाशिककरांना अनुभवायला मिळाली. रविवारी नाशिकच्या किमान तापमानात दोन अंशाने वाढ होऊन १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. तर कमाल तापमानाने पुन्हा तीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, नाशिकचे कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. कमाल तापमानातही साधारणतः दोन अंश सेल्सिअसची वाढ अवघ्या एका दिवसांत नोंदविली गेली आहे. Dindori:’अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ चा जयघोष
नाशिक : थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. गोदावरी नदीकाठावर थंडीमुळे शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. गर्द धुक्यात रामतीर्थावरील गोदाकाठच्या मंदिराचे मन प्रसन्न करणारे मनमोहक दृश्य.

ढगाळ वातावरणाचा परिणाम
काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. रविवारी पुन्हा शहरातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. यामुळे वातावरणातील गारठा घटल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.