Last Updated on December 19, 2022 by Jyoti S.
Trimbakeshwar: वाहनतळामुळे गावातला शतकी परंपरेचा उत्सव गावाबाहेर हलवावा लागणार
Trimbakeshwar: संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यात्रा म्हणजेच पौषवारी आता महिनाभरावर येऊन ठेपली आहे. आणखी १०-१२ दिवसांनी पायी येणाऱ्या वारकरी, दिंड्यांचे प्रस्थान लवकरच सुरू होईल. मागची दोन वर्षे कोरोना लॉकडाउन असल्याने पौषवारीला येता आले नाही, असे लाखो वारकरी यावर्षी उत्साहाने आणि टपटीच्या संख्येने येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. संत नेनाथ मंदिराच्या समोरच्या बाजम असलेले यात्रा पटांगण अतिक्रमणांनी व्यापल्याने यंदा यात्रा भरणार कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना निर्बंध उठल्यानंतर श्रावणापासून सुरू झालेल्या विविध उत्सवांप्रसंगी उसळलेली प्रचंड गर्दी तसेच शनिवार, रविवार, महिन्याची वारी, एकादशी आणिशासकीय सुट्यांदरम्यान अलोट गर्दी होत आहे. त्यामुळेच यावर्षी पौषवारी गर्दीचा उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. यावर्षी १८ जानेवारी २०२३ रोजी एकादशी आहे. १०-१५ वर्षांपूर्वी थेट दशमीला शहरात दिंड्या दाखल व्हायच्या. मानाच्या पारंपरिक दिंड्या आजही दशमीला येतात. मात्र, नव्याने सुरू झालेल्या दिंड्या पालख्या चार दिवस अगोदरच येतात. यात्रोत्सवात येणारे व्यावसायिकही अगोदरच दाखल होत असतात. साधरणतः १६ जानेवारीपासून यात्रा भरेल असे दिसत आहे. तत्पूर्वी संक्रांतीचा पर्वकाळ साधण्यासाठी भाविक येत असतात. त्यामुळे आठवडाभर अगोदरच यात्रेचे वातावरण तयार होईल, असे दिसते.
हेही वाचा: Majhi kanya Yojna : तुम्हाला जर फक्त मुली असतील तर मिळतील 50 हजार रुपये तात्काळ अशाप्रकारे करा अर्ज.

अतिक्रमणांनी गिळले भूखंड
वारकऱ्यांना निवान्याच्या सुविधा, दिधा उतरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात जागा शिल्लक राहिलेली नाही. संत निवृत्तिनाथ मंदिराच्या समोरच्या बाजूस असलेले यात्रा पटांगण आता अतिक्रमणांनी व्यापले आहे. तेथे शासकीय इमारतीदेखील बिनदिक्कत उभ्या राहिल्या आहेत. सरकारी भूखंड हळूहळू लुप्त होत आहेत. यात्रेसाठी या मोकळ्या जागा आरक्षित ठेवण्याची गरज होती. मात्र, अगदी अलीकडे त्यावर बांधकामे सुरू आहेत. नगर परिषदेने काही महिन्यांपूर्वी तलाठी कार्यालयासमोरच्या भूखंडावर वाहनतळ बांधले आहे. त्यामुळे मागच्या शतकात येथे भरणारी यात्रा आता गावाबाहेर हलवावी लागणार आहे. वारकरी दोन-चार किलोमीटर दूर अंतरावर विसावत तेथेच भजन-कीर्तन करतात आणि नगर प्रदक्षिणेसाठी मंदिराकडे येतात. मंदिराकडे जाताना आणि परतताना चालण्यासही रस्ता नसतो. याकडे कोणाचेही लक्ष नाही.
भेटीचे हक्काचे ठिकाण(Trimbakeshwar)
पूर्वी लोक बैलगाडीने यायचे आता ट्रॅक्टर अथवा पिकअपसारखी वाहने घेऊन येतात. सासुरवाशीण सुनेला माहेरच्या माणसांची भेट घेता यायची. आई-वडिलांना आपल्या लेकीला, नातवंडांना भेटून आनंद व्हायचा. त्यांना खाऊ, खेळणी घेऊन देत यात्रा सफल झाल्याचे समाधान वाटत होते. आजही गावोगावचे हरिनाम सप्ताह, गावाकडच्या जत्रा यांचे नियोजन या ठेप्यावर होते. गावची भिशी, उधार उसनवार, सोयरीक जुळविणे अथवा काही कारणाने रुसवे-फुगवे होऊन नांदायला येत नसेल, तर त्यांची समजूत काढणे यासाठी एकादशीच्या दुपारी फराळ आटोपल्यावर बैठका होत. अशा या जत्रेला आता त्र्यंबकनगरीत जागा शिल्लक राहिली नसल्याचे विदारक चित्र आहे.