Last Updated on January 1, 2023 by Jyoti S.
Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वरचे मंदिर ऋषभ पंतच्या आठ दिवस राहणार बंद
त्र्यंबकेश्वर(Trimbakeshwar Temple) : बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक त्र्यंबकराजाच्या मंदिरातील पिंडीला करण्यात येणाऱ्या वज्रलेपासह संवर्धन व देखभाल दुरुस्तीकरिता मंदिर दि.५ ते १२ जानेवारी २०१३ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग
वैशिष्ट्यपूर्ण असून, येथे पिंडीवर शाळुंका नाही. पिंडीच्या आत अंगठ्याच्या आकाराची तीन लिंगे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या स्वरूपात आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये पिंडीच्या वज्रलेपाला धक्का पोहोचला होता. त्याचवेळी पुरातत्त्व खात्याच्या
अधिकाऱ्यांनी वज्रलेपाचा निर्णय जाहीर केला होता. अखेर देवस्थान प्रशासनाने दि.५ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Chicken updates : शेंगदाणे आणि लसूण खाणाऱ्या कोंबडीने चक्क एका दिवसात दिली 31अंडी!!!
…अखेर मुहूर्त लागला!
मंदिरातील पिंडीची झीज होत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी शिवलिंगाला आठ वर्षांपूर्वी वज्रलेप करण्यात आला होता.
परंतु काही महिन्यांपूर्वी(Trimbakeshwar Temple) या पिंडीची झीज होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वज्रलेपावरून बरेच चर्चितचर्वण झाले. अखेर त्याला मुहूर्त लाभला आहे.