Villages in Nashik District : आनंदाची बातमी! नाशिक जिल्यामध्ये हे ५१ गाव होणार ‘मॉडेल व्हिलेज’ बघा, तेथे काय काय होणार.

Last Updated on July 21, 2023 by Jyoti Shinde

Villages in Nashik District

नाशिक जिल्ह्यातील गावे(Villages in Nashik District) : ‘स्मार्ट व्हिलेज‘ ही संकल्पना जिल्हा पंचायतीमार्फत राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील 45 गावे प्रत्येक तालुक्यातून 3 अशी निवडण्यात आली आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

नाशिक पालकमंत्री दादा भुसे(dada bhuse) यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट व्हिलेज'(Villages in Nashik District) ही संकल्पना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन गावांची 45 गावे निवडण्यात आली आहेत. निवडलेल्या गावांसाठी काही योजना प्राधान्याने दिल्या जातील.

आता ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या आशिमा मित्तल यांनी याबाबत मोठे नियोजन सुरू केलेले आहे. आर. आर. पाटील पुरस्कारप्राप्त गावांचा या योजने मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये(Villages in Nashik District) आता नाशिक जिल्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आता तीन गावांची एकूण 45 गावे निवडण्यात येत आहेत.

त्यानुसार सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे आयोजन करून त्या ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर 36 बाबींवर काम सुरू आहे. यातून स्मार्ट व्हिलेजची संकल्पना पूर्ण होणार आहे.Villages in Nashik District

हेही वाचा:

PM kisan 14th hapta :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेला तुमच्या खात्यात 2,000 रु. येतील, असे तपासा

हि तालुकानिहाय गावे निवडली


नाशिक : दारी, मुंगसरे, कोटमगाव, गणेशगाव, माणिकखांब
इगतपुरी : शिरसाठे, मॉडेल, नागोसाळी
त्र्यंबकेश्वर : वरदुंजे, कचुराली, आंबोली,वाघेरा
पेठ : कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ
सुरगाणा: बुबली, हातरुंडी, म्हैस खडक
दिंडोरी : करंजवण, कोल्हेर, गोंदेगाव
कळवण : सुळे, नांदुरी, मेहदर
बागलाण : पिंपळदरे, रातीर, नवीन निरपूर
देवळा : वरवंडी, खलप, माळवाडी
चांदवड : राजदेरवाडी, हिरापूर, नन्हवे,रायपुर
मालेगाव : नीलगाव, बेळगाव, मुंगसे
नांदगाव : बोर्ले, श्रीरामनगर, भालुर
येवला : महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु.
निफाड : थेरगाव, आहेरगाव, साकोर मिग
सिन्नर : वडांगळी, चिंचोली, दातली

हेही वाचा:

Todays weather : पावसाने केला कहर! 16 मे पर्यंत ‘या’ राज्यांमध्ये वादळासह मुसळधार पावसाचे संकेत, ‘मोचा’ चक्रीवादळाचा प्रभाव दिसेल