Last Updated on January 30, 2023 by Jyoti S.
Weather forecast : मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा
थोडं पण महत्वाचं
अवकाळी पावसाचा इशारा: हवामान खात्याने (IMD) पुढील चार ते पाच दिवस राज्यात सौम्य थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र(Weather forecast) आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
राज्यात २ फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित, हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम
मुंबई(Mumbai), पुणे(Pune), नाशिक (Nashik) हवामानाचा अंदाज मराठीत
हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलकीशी थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. (मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा)
दरम्यान, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्यात 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट(Weather forecast) कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात ही लाट अधिक राहिल्यास मुंबईतील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. किमान तापमानात किंचित वाढ होईल. मात्र, दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे नुकसान
राज्यातील मराठवाडा तसेच विदर्भात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या थंडीचा परिणाम(Weather forecast) पिकांवर होत आहे. पुन्हा पाऊस झाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.राज्यात तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकाला फटका बसला आहे. गहू, हरभरा, मका या पिकांनाही या वातावरणाचा मोठा फटका बसणार असून त्यातील उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.