नाशिक-मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण केव्हा?

Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.

भुजबळांचे केंद्रीय मंत्री गडकरींना पत्र

टोल कंपन्यांकडून लूट

या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम 2014 मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षांनी या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र, संबंधित कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. “त्या रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी खोलगट भाग आणि उंचवटे तयार झाल्यामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागतो आहे . त्यामुळेच सहापदरी रस्त्याचे काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात यावे, अशी मागणी माननीय छगन भुजबळ यांनी केलेली आहे.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिटचा करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी गडकरी यांना पत्र दिले आहे.

भुजबळ यांनी नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दि. 4 ऑक्टोबर 2014 रोजी नाशिकमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे. नाशिक ते मुंबई हा चारपदरी रस्ता आहे.

पावसामुळे पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. शहापूर ते वडपे या परिसरातील रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्यामुळे याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होत असतो . जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा प्रसार यामुळे या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तासन्तास वेळ घालवावा लागत आहे. लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत अडथळे निर्माण होत आहेत. त्याच कारणामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय गरजेचे आहे. परंतु या सहापदरी रस्त्याचा डी. पी. आर. मंजूरी करून प्रत्यक्ष काम सुरू व्हायला शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे असे दिसून येते . या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नूतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबीमधील कामाचे तत्काळ नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे. हेही वाचा :सुरत – चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी

Comments are closed.