Last Updated on January 1, 2023 by Jyoti S.
Niphad: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज निफाडला बैठक
निफाड : तालुक्यातील शेतकरी प्रश्नावरील सर्व संघटना यांची नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (दि. १) सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, निफाड येथे आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीत १६ जानेवारी रोजी होणाऱ्या महामोर्चाच्या (Niphad) अनुषंगाने चर्चा होणार आहे. शरद जोशी प्रणीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी.
हेही वाचा: Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी
आम आदमी पार्टीचे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन निवृत्ती गारे पाटील व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.