Saturday, February 24

Niphad Sunderpur(सुंदरपूर) :बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार, बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

Last Updated on December 23, 2022 by Taluka Post

Niphad Sunderpur(सुंदरपूर) :बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार, बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

निफाड: तालुक्यातील सुंदरपूर येथे गुरुवारच्या पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या, १ बोकड ठार तर एक वासरू जखमी झाले.सुंदरपूर गावालगत श्यामराव नरहरी सोमवंशी यांची वस्ती आहे. त्यांच्या शेतातील घरालगत जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यामध्ये शेळ्या, गायी आणि वासरू बांधलेले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने या गोठ्याच्या कमी उंचीवरील भिंतीवर चढून गोठ्यात प्रवेश केला आणि गोठ्यातील आठ शेळ्या व एका बोकडावर हल्ला करून त्यांना ठार केले. या हल्ल्यात एक वासरू जखमी झाले आहे.

वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

गुरुवारी सकाळी सोमवंशी कुटुंबीयांच्या ही घटना लक्षात आली. यानंतर ही घटना वनविभागाला कळविण्यात आली.

वनविभागाचे भगवान जाधव, वनसेवक भैय्या शेख, तलाठी शंकर खंडागळे आदींनी भेट दिली.

तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वोचकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. रवींद्र चांदोरे यांनी तपासणी केली.

हेही वाचा: Niphad give electricity : वीज द्या ! वीज द्या ! शेतकऱ्यांना सुरळीत वीज द्या!