Last Updated on December 21, 2022 by Taluka Post
Niphad Taluka: निफाड तालुक्यात अनिल कदम यांचे वर्चस्व ?आमचा निफाड मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
निफाड(Niphad Taluka) : तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना जोरदार तडाखा बसला आहे. बनकर यांच्या स्वतःच्या गावात त्यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे, तर माजी आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल कदम यांनी निफाड तालुक्यात आपले वर्चस्व टिकून आहे, हे या निमित्ताने दाखवून दिले. त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी चांगला विजय मिळवलेला आहे.
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार अनिल पाटील कदम यांनी सांगितले की, आपण शांततेत क्रांतीची वाटचाल करीत आहोत. तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सत्तांतर झाल्याचे दिसून येत आहे. लोकांना परिवर्तन हवे असल्याची चाहूल यातून लागते आहे. कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामांची पावती मतदारांनी दिली आहे. त्यांनी अशीच चांगली कामे यापुढे करावी ही अपेक्षा ठेवतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
सरपंचपदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
पिंपळगाव बसवंत भास्करराव बनकर, चांदोरी विनायक खरात, साकोरे – मिग- शोभा बोरस्ते, पिंपळस नीशा ताजणे, कसबे सुकेणे – आनंद भंडारे, निमगाव वाकडा – पूजा दरेकर, लोणवाडी, पल्लवी साळवे, सोनेवाडी खुर्द लता आव्हाड, खडक माळेगाव जगदीश पवार, बोकडदरे विजय – सानप, धारणगाव वीर दीपक सोनवणे, मांजरगाव- वंदना सोनवणे, तारुखेडले अनसूया आंधळे, शिंगवे – सुशीला पवार, थेटाळे – शीतल – शिंदे, कोटमगाव आरती, कडाळे, खानगाव थडी – भाऊसाहेब दौड, दीक्षी योगेश्वर चौधरी, नांदुर्डी- जयश्री जाधव, कोकणगाव- सुरेखा मोरे
हेही वाचा: Sinner: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात मायलेक जागीच ठार