Monday, February 26

Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी

Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.

Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी

Niphad: सत्ताधारी गटाचा उपोषणाचा इशारा

Niphad: नगरपंचायतीत कोणताही अनागोंदी कारभार किंवा भ्रष्टाचार नसून माजी नगराध्यक्षांकडून निफाड शहराची बदनामी केली जात आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे सादर न केल्यास त्यांच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे-पाटील, आरोग्य सभापती साहेबराव बर्डे व नगरसेवकांनी दिला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

निफाडच्या(Niphad) माजी नगराध्यक्ष रुपाली रंधवे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निफाडमध्ये अनागोंदी व भ्रष्टाचार सुरू असून, चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि सभापती साहेबराव बर्डे यांनी सदर आरोप हे संपूर्णपणे निराधार आणि चुकीचे असून, संपूर्ण शहराची बदनामी करणारे आहेत. गावात कोठेही कचन्याचे साम्राज्य तरीही साम्राज्य पसरलेले नाही तरीही नगरपंचायतीला समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या बाबत सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रंधवे यांच्याच कार्यकाळात साफसफाईचा ठेका देण्यात आलेला असून, त्यांच्या कार्यकाळात जी बिले अदा केली जायची त्याच पद्धतीने आजही ठेकेदाराला बिले अदा केली जात आहेत. वास्तविक पाहता ठेका हा ऑनलाइन टेंडर पद्धतीने, पारदर्शकपणाने व सर्वांत फायदेशीर बोलीवरच देण्यात आलेला आहे.

त्यामुळे नगरपंचायतीचा आर्थिक लाभ झालेला आहे. ठेकेदाराला नगरपंचायतीकडून वाहने ही ही भाड्याने दिली जात असल्याने तेथे नगरपंचायतीला आर्थिक उत्पन्न मिळत असते. ज्या ठिकाणी कचरा संकलित केला जातो त्या ठिकाणी(Niphad) नागरी वस्ती नसून पूर्वीपासून तेथे कचरा संकलनाचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, उपनगराध्यक्ष अनिल पाटील, स्वच्छता आरोग्य व शिक्षण सभापती साहेबराव बर्डे, पाणीपुरवठा सभापती संदीप जेऊघाले, नगरसेवक किशोर ढेपले, नगरसेविका डॉ. कविता धारराव, डॉ. सविता तातेड, शारदा कापसे, अलका निकम, संदीप शिंदे, तसेच देवदत्त कापसे, आसिफ पठाण, डॉ. नितीन धारराव. हरिष कर्डिले, मोहन जाधव, सोमनाथ निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.हेही वाचा: Niphad Sunderpur(सुंदरपूर) :बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार, बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

पुरावे सादर न केल्यास उपोषण

कचरा संकलित करताना पारदर्शक कारभारासाठी नागरिकांच्या सह्या घेतल्या जातात, त्या ठिकाणचे फोटो(Niphad) घेतले जातात इतकेच नव्हे तर कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस इंटरनेटद्वारे देखरेख ठेवली जात असते. ही सर्व वस्तुस्थिती असतानादेखील केवळ स्वतःच्या राजकीय लाभासाठी आणि शहराच्या विकासात अडथळे आणण्यासाठी खोटेनाटे आरोप केले जात आहेत. हे सर्व निषेधार्थ असून, संबंधितांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर न केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा कठोर इशारा त्यांनी दिला आहे.