पोलीस नियमां नुसार कार्यवाही करतील ,राजकीय सूड भावनेतून कारवाई नाही : मुखमंत्री शिंदे स्पष्टच बोलले

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

आपलं कायद्याचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थिती कायदा हातात घेणे खप वून घेतले जाणार नाही, असे CM एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी चे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला . या प्रकरणी आमदारकी चा राजीनामा देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमी वर महाविकास आघाडी चे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकार वर निशाणा साधत आहेत. यावर खुद्द मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस नियमां नुसार गुन्ह्याची चौकशी करतील. या प्रकरणी तपास करतील. पडताळणी करतील. काही तक्रार आहे, त्यात तथ्य असेल नसेल, त्याप्रमाणे पोलीस कार्यवाही करतील. आमच्या सरकारने राजकीय सूड भावने पोटी कोणतीही कारवाई केले ली नाही आणि करणार ही नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थिती कायदा हातात घेणे खप वून घेतले जाणार नाही

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई-नाशिक हायवेवर जाळ पोळ करण्यात आली. या संदर्भात एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमां नुसार चालते. लोकशाही मार्गा ने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्या ही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसां वर नाही, तसा दबाव टाकलाही जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, राजकीय षड्यंत्र रचले गेल्याचा आरोप विरोधकां कडून करण्यात आला असून, यावर बोलताना, कोणी षड्यंत्र रचले, ते त्यांनाच विचारा. असे षड्यंत्र कोणी ही रचले ले नाही. आव्हाड हे आमदार आहेत, लोक प्रतिनिधी आहेत. ठाण्या तील एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो. पुन्हा एकदा सांगतो की, तक्रारीत काय तथ्य आहे नसेल, तर त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करतील, असे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हेही वाचा नाशिक मध्ये बाळासाहेबांची शिवसेनेत फूट? एकनाथ शिंदे यांच्या दोन आमदारांमध्ये वाद;