
Last Updated on July 24, 2023 by Jyoti Shinde
Ajit pawar news
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. गेल्या सात ते आठ दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची अजित पवार यांनी दखल घेतली आहे.
आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांत अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोक पुरात वाहून गेले. यासोबतच अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांना घरेही गमवावी लागली आहेत. या सर्व घटनांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या सर्व घटना पाहता त्यांनी आज विधानपरिषदेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.Ajit pawar news
यवतमाळ, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. NDRF ने यवतमाळमधील 110 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. मदतीसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली होती, असे अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
अजित पवारांच्या तीन घोषणा काय आहेत?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत राज्यातील पूरपरिस्थितीवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. पूरग्रस्तांना 10,000 रुपये तात्काळ मदत म्हणून देण्यात येणार आहे. दुकानांचे नुकसान झाल्यास 50 हजार रुपये आणि पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.Ajit pawar news
अजित पवार आणखी काय म्हणाले?
बुलढाणा जिल्ह्यात 102 मिमी पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आला होता. वाशिममध्ये 139.7 मिमी पाऊस झाला. विधानपरिषदेत अजित पवार म्हणाले, विविध जिल्ह्यांमध्ये मदत पथके तैनात करण्यात आली आहेत.
या अवकाळी पावसात मृत्युमुखी पडलेल्यांना ४ लाखांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. लोकांना त्यांचे पिक पंचनामा तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या घरांचे पुरात नुकसान झाले त्यांना 5 हजारांऐवजी 10 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
“धोकादायक परिस्थितीत असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे. पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत त्वरित देण्यात यावी. शेती पिकांच्या नुकसानीची ५० टक्के भरपाई तातडीने द्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.Ajit pawar news
“जिथे शेतजमिनीची धूप झाली आहे, त्याठिकाणी पंचनामा करून जमीन पूर्ववत करण्यासाठी लागणारा खर्च निश्चित करण्यात यावा. बाधितांना दुकानात स्वस्त दरात धान्य वाटप करण्याच्या सूचनाही दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी विधानपरिषदेत स्पष्टपणे सांगितले की, ‘ज्यांची घरे पाण्याखाली गेली त्यांना 5 हजार रुपयांची मदत देण्याची कारवाई करण्यात येणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला.’