Amol Mitkari : आता लवकरच या शहराचे नाव बदलणार?

Last Updated on January 13, 2023 by Jyoti S.

Amol Mitkari: लवकरच मागणी येईल.

काही दिवसांपूर्वी राज्यात अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुढे आल्यानंतर राजकारणात शहरांच्या नामांतराचा मुद्दा सुरूच ठेवत आमदार अमोल मिटकरी यांनी आज सकाळी दुसऱ्या शहराच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

‘पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर करावे’, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी केली आहे. एवढेच नाही तर राज्यातील शिवभक्तांची हीच इच्छा असल्याचे ट्विटही त्यांनी केले आहे.

आगामी विधिमंडळ अधिवेशनात पुणे शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण केले आहे. त्यानंतर आता अहमदनगर आणि आता पुणे शहराच्या नामांतराबाबत राज्यात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला असता अनेक ट्विटर युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) म्हणाले..

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, “पुण्याचे नाव बदलून ‘जिजाऊ नगर’ व्हावे, अशी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येत्या अधिवेशनात सरकारकडे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Basmati rice : बासमती तांदळाबाबत मोठी बातमी, FSSAI ने जारी केले नवे नियम..

दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह सुमारे 18 नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांच्या नामांतराचा आणि त्याचे श्रेय कोणी घ्यायचे, या मुद्द्याला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील या मोठ्या शहरांमध्ये विकासाबाबत कोणी का बोलत नाही, अशा प्रतिक्रिया ट्विटर युजर्स आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments are closed.