Last Updated on January 6, 2023 by Jyoti S.
Elections to Market Committees : रतात! कोर्टाने दिली ३० एप्रिलची डेडलाइन
Table of Contents
नागपूर(Nagpur) : राज्यामधील कार्यकाळ संपलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३० एप्रिलपूर्वी घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणला दिला. तसेच, ही निवडणूक निर्धारित मुदतीत पार पडण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक प्राधिकरणाला आवश्यक सहकार्य करावे व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगितले.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रोहित देव वयानशिवराज खोब्रागडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. निर्वाचित व्यवस्थापकीय मंडळाची मुदत संपूनही अनेक बाजार समित्यांची निवडणूक घेण्यात आली नाही. काही बाजार समित्यांमध्ये जुन्याच व्यवस्थापकीय मंडळाला मुदतवाढ देण्यात आली, तर काही बाजार समित्यांमध्ये(Elections to Market Committees) प्रशासक किंवा प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. त्याविरुद्ध उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्यपीठासह नागपूर व औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आल्या. सम विषय असल्याने त्या सर्व नागपूर खंडपीठात एकत्र सुनावणी करून हा आदेश जारी करण्यात आला.
….असे आहेत आदेश
निवडणूक होईपर्यंत. बाजार समित्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासक किंवा प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती करण्याची न्यायालयाने राज्य सरकारला मुभा दिली, तसेच यासंदर्भात राज्यभरात एकसमान धोरण राबविण्याची सूचना केली.
हेही वाचा: OBC student updates: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोठा घोषणा…
काही बाजार समित्यांमध्ये २नर्वाचित व्यवस्थापकीय मंडळ कार्यरत आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.