एमपीएससी नाही तरी आमदार होता येते!

Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.

आ. गोपीचंद पडळकर यांचा अजब सल्ला.

राज्यकर्त्यांना भीती डोक्यांची – सदाभाऊ खोत

दरवर्षी राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन आयोजित केले पाहिजे, त्याचा फायदा होईल. राज्यकर्त्यांना सर्वांत जास्त भीती डोक्यांची वाटते. जिकडे जास्त डोकी, तिकडं जास्त राज्यकर्ते बोलतात. कारण, राज्यकर्ते हे एक रेड्याची औलाद आहे. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, असे वादग्रस्त विधान माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी या कार्यक्रमात केले.

पुणे: एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून चिंता करू नका. एमपीएससी झालो नाही तरी आमदार आणि खासदार होता येते, असा अजब सल्ला आ. गोपीचंद पडळकर यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिला. आ. पडळकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आमदार आणि खासदाराने कधी आत्महत्या केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? असा सवालच या विद्यार्थ्यांना पडळकर यांनी केला.

एमपीएससीच्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करत होते. पडळकर म्हणाले, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि आरक्षित जागांचा विषय सरकार दरबारी मांडण्यात येतील.तुम्ही एमपीएससी झाला नाही तर गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहत आहे. एमपीएससी झाला नाही तर पंचायत समितीच्या सदस्यपदाची जागा वाट पाहत आहे. तुम्हाला सभापती होता येईल. झेडपी मेंबर होता येईल. इथे स्पर्धा मोठी आहे. जो तो म्हणतो एमपीएससीत स्पर्धा मोठी आहे. पण तसे नाही. इथे 12 कोटीतून 288 आमदार विधानसभेत आहेत. ही त्या मानाने किती मोठी स्पर्धा आहे, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

निवडणुकीत पडला म्हणून माजी आमदाराने आत्महत्या केली, असे कधी तुम्ही ऐकलंय? मंत्रीपदाच्या यादीत नाव आले नाही म्हणून आमदाराने आत्महत्या केली असे ऐकलं का? मग त्यांना निराशा आली नसेल का ? असा सवालही त्यांनी विद्यार्थ्यांना केला. हेही वाचा : खुशखबर सर्वात मोठी भरती : नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा