Last Updated on December 9, 2022 by Jyoti S.
Hydrogen: ‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली शिंदे यांची भेट
मुंबई, ता. ८. : हायड्रोजनवर(Hydrogen) चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकेतील ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत याबाबतीत सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली आहेनाशिकसह राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट करा
याचा खूप मोठा फायदा होणार आहे जसे राज्यामध्ये हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प ट्रिटॉन कंपनीने सुरु केल्यास आता हायड्रोजनची निर्मिती प्रकल्प आणि या प्रकल्पांसाठी लागणारे इतर उद्योगदेखील महाराष्ट्रातच सुरु होतील, तसेच परिणामी गुंतवणूक देखील वाढेल आणि प्रत्यक्ष किव्हा अप्रत्यक्ष रित्या हजारो रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे . या कंपनीला महाराष्ट्रामध्ये हे उद्योग सुरु करण्यासाठी पुणे, नागपूर,ऑरिक (औरंगाबाद),अश्या विविध ठिकाणी हे मार्ग उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा आता हायड्रोजन वाहने ही वापरण्यास परवडणारी तसेच , माणसाला सुरक्षित असून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा स्वस्तच आहेत. इंग्लंड, जर्मनी, चीन, अमेरिका आदी देशांमध्ये हायड्रोजन (Hydrogen)वाहनांचा वापर होत असून महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांतील बस भाडेतत्वावर घेऊन हायड्रोजनवर चालविता येणे शक्य आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्या कंपन्यांना प्रस्ताव दिला आहे तेव्हा ते म्हणाले आम्ही याबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले . एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री