Tuesday, February 27

Maratha arakshan breaking news: म्हणून मराठा समाजाचे आरक्षण 16 टक्क्यांवरून 10 टक्के झाले.

Last Updated on February 20, 2024 by Jyoti Shinde

Maratha arakshan breaking news

नाशिक : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी ‘आरक्षण विधेयक 2024’ आज एकमताने मंजूर करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी ‘आरक्षण विधेयक 2024‘ आज एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार राज्यात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा : Astrology Tip: Astro Tips: अशी बोटे असणाऱ्यांना व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, वेळीच काळजी घ्या!

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला पूर्वीचे १६ टक्के आरक्षण कमी करून १० टक्के कसे केले? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर विधानभवन परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.(Maratha arakshan breaking news)

पृथ्वीराज चव्हाण(pruthviraj chavan) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री असताना 13 टक्के आरक्षण दिले होते, आता 10 टक्के दिले आहे. ही टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. मग टीका करणार की नाही? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला.

अखेर फडणवीस काय म्हणाले?

या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने 16 टक्के आरक्षण नाकारले. तेव्हा आम्ही १६ टक्के दिले होते, न्यायालयाने तार्किकदृष्ट्या ते १२ आणि १३ टक्के केले… आता राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकषांवर आधारित तपासणी केली. त्या तपासणीचा अहवाल त्यांनी दिला.

शेवटी, टक्केवारी ठरवताना आम्हाला आमच्या अहवालात दिलेली निरीक्षणे आणि न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या आधारे निर्णय घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे EWS ला 10 टक्के आरक्षण दिले होते, त्याचप्रमाणे SEBC (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग) ला देखील 10 टक्के आरक्षण देण्यात आले होते.(Maratha arakshan breaking news)

फडणवीस पुढे म्हणाले की, यापुढे जिथे जिथे सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील तिथे मराठा समाजातील उमेदवारांना हे 10 टक्के आरक्षण लागू होईल.