शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी जोरदार आक्रमक, धोतर सोडण्याचे अनोखे आंदोलन

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातील चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून संपूर्ण राज्यभरात आंदोलनं केली जात आहे. शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून धोतर सोडण्याचे अनोखे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं आहे . पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर सोडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे . यावेळी राष्ट्रवादी ने राज्यपाल कोश्यारी यांचा डमी आणत त्यांना उठाबश्या काढायला लावल्या होत्या . तसंच या डमीचं धोतर फेडत अनोख्या पद्धतीने आंदोलन हि करण्यात आलं.

हा महाराष्ट्र कालही छत्रपतींचा होता आजही छत्रपतींचा आहे आणि उद्याही छत्रपतींचा राहील असे त्यांनी सांगितले . मात्र सर्व भाजपची लाचारी पत्करलेल्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांचा अपमान दिसतो. पण छत्रपतींच्या अपमानावर ते मौन बाळगून आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशी टीका यावेळेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श थे , अभी तुम लोगो के सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असं वक्तव्य त्या वेळेस राज्यपालांनी केलेलं होतं. यानंतर पासून राज्यपालांवर जोरदार टीका होत आहे. त्याचमुळे आज ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट जोरदार आक्रमक झाली आहे. हेही वाचा: पवार,गडकरीना हीरो म्हणायच्या नादात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना.

Comments are closed.