OBC student updates: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोठा घोषणा…

Last Updated on December 29, 2022 by Jyoti S.

OBC student updates: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोठा घोषणा…

राज्यातील मागास प्रवर्गातील सर्व ओबीसी विद्यार्थ्यांसाठी(OBC student updates) आता खूप मोठी आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘स्वाधार’ प्रमाणे योजना लागू करणार असल्याची मोठी घोषणा आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशना मध्ये ही घोषणा केलेली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कशी असणार योजना..?

फडणवीस म्हणाले, की राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी(OBC student updates) ‘आता आपण स्वाधार’ सारखीच योजना सुरू करणार आहोत. त्यात विद्यार्थ्यांच्या राहण्याचा, जेवणाचा, तसेच, शिक्षणाचा खर्च सगळं काही सरकार करणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ‘डीबीटी’द्वारे पैसे सुद्धा पाठवले जातील. या योजनेचा लाभ आता आपल्या 31 जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना होईल.

अनुसूचित जाती, मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी फेलोशिप देखील दिली जाते. अशीच फेलोशिप आदिवासी विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. तसेच आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्यात किमान पाच वसतिगृहे सुरू करणार असून, त्यासाठी जागा निश्चित केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ओबीसी(OBC student updates) वसतीगृह हे आता खासगी संस्थांना नव्हे, तर स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी यापुढे दिली जातील. अशा प्रकारची योजना हि आपल्या समाज कल्याण खात्यामार्फत सुरू आहे. तसेच खासगी व्यक्तीकडे कुठलीच जबाबदारी देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.हेही वाचा: DAP Fertilizer: खताचे फायदे आणि तोटे, वापरण्यापूर्वी ही बातमी वाचा

स्वाधार योजनेबाबत…

राज्य सरकारने 2016-17 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली. अकरावी, बारावी, तसेच व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या, परंतु आता कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता स्वाधार योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळतो. या योजनेत फडणवीसांनी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान दिले जाते.