गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो

Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.

32 किमीच्या रोड शोद्वारे 14 मतदारसंघांत शक्तिप्रदर्शन

अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडत असतानाच भाजपने दुसऱ्या टण्याच्या प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यात तीन झंझावाती प्रचार सभा घेतानाच तब्बल 32 किमी लांबीचा रोड शोदेखील केला. या रोड शोद्वारे मोदींनी अहमदाबादमधील 13 आणि दक्षिण गांधीनगरमधील एक अशा 14 विधानसभा मतदारसंघांत शक्तिप्रदर्शन केले.

गत निवडणुकीत यांपैकी 11 जागा भाजपने जिंकल्या होत्या. पंतप्रधानांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा रोड शो होता. संध्याकाळी सव्वापाच वाजता रोड शो सुरू झाला. मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. भाजप समर्थकांनी फुलांची उधळण करत मोदींचा जयघोष केला. खास रोड शोसाठी तयार करण्यात आलेल्या वाहनावर उभे राहून पंतप्रधानांनी लोकांना अभिवादन केले. रोड शोदरम्यान एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देण्यासाठी पंतप्रधानांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला होता. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील साणंदमध्ये रोड शो यांनीदेखील साणंदमध्ये रोड शो केला. दुसऱ्या टप्प्यातील 93 चा जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत.

Comments are closed.