Rahul Gandhi:इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं, राहुल गांधी हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

Rahul Gandhi: सरकारला जर वाटत असेल की भारत जोडो यात्रा आपण रोखावी, तर त्यांनी तसं करावं


वर्धा : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सावरकर वक्तव्यावरुन शिंदे आणि भाजप गट खूप आक्रमक झाला आहे. याबाबतीत बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांनी (Swatantryaveer Sawarkar) इंग्रजांना लिहिलेले पत्र लोकांसमोर वाचून दाखवलं. ‘सर मी तुमचा नोकर राहू इच्छित आहे, असं सावरकरांनी त्या पात्रात इंग्रजांना लिहलेलं होतं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे

त्या काळी सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, याबाबत मी स्पष्ट आहे असं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे . ते देवेंद्र फडणवीसांना म्हणतात कि तुम्ही ते पात्र वाचावं मग तुम काय ते नक्की कळेल . राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींची यात्रा रोखण्याच्या मागणी केलेली आहे त्यावर राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, यात्रा रोखायची असेल तर तुम्ही जरूर रोखावी. आम्हाला काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो त्याने मांडला पाहिजे. जर सरकारला वाटत असेल की भारत जोडो यात्रा आपण रोखावी तर त्यांनी तसं करावं.

Comments are closed.