संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

Last Updated on November 28, 2022 by Taluka Post

शिवभक्तांच्या भावना लक्षात न घेतल्यास उठाव!

मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रमुख व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, याचा अर्थ सरकार मधील राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.

कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारला जाब विचारला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. तसे अधिकृत पत्रही त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठवले होते. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. याचा अर्थ राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहेत का? असा सवाल विचारत संभाजीराजे यांनी ‘महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये, शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.