Shiv Sena : शिवसेना कुणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे निकाल जाहीर

Last Updated on February 17, 2023 by Jyoti S.

Shiv Sena

केंद्रीय निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव ‘शिवसेना’ पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ म्हणजेच शिंदे गटाला देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांना ठाकरे गटाचा मोठा धक्का मानला जात आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शिवसेना कोणाची, धनुष्यबाण पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?

यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. आयोगाला प्रतिज्ञापत्र देऊन आपल्या बाजूने निकाल लावायचा, अशी स्पर्धा ठाकरे गट आणि शिंदे गटात होती. आता ठाकरे गटाचे चिन्ह(Shiv Sena) आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्यात आल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.

उद्धव ठाकरेंपुढे शिवसेना हरली, एकनाथ शिंदेंना सलाम! क्लिक करून पहा काय म्हणतात ते


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लढतीत उद्धव ठाकरे(uddav thackeray) गटाचा शिंदे गटाकडून पराभव झाला आहे. पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आता शिंदे गटाला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे 40 आमदारांसह वेगळे झाले आणि ‘आम्हीच खरी शिवसेना आहोत’ असे म्हटले होते. यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली, मात्र आता कायदेशीररित्या शिवसेना पक्ष आणि शिंदे-ठाकरे गटातील पक्ष चिन्हावरून सुरू असलेला वाद आज संपुष्टात आला आहे.

हेसुद्धा वाचलात का?

crop loan : आनंदाची बातमी…! शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज मिळणार