Wadalibhoi :वडाळीभोईत शिवसेनेचाच दणदणीत विजय!!!??

Last Updated on December 21, 2022 by Jyoti S.

Wadalibhoi: वडाळीभोईत शिवसेनेने फडकवला भगवा

चांदवड : वडाळीभोई(Wadalibhoi) ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता काबीज करीत भगवा फडकविल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना नितीन आहेर, कारभारी आहेर, विलास भवर, प्रदीप आहेर, चंद्रकांत आहेर, बंडू गांगुर्डे, संदीप उगले, संतोष जाधव आदींसह कार्यकर्ते व समर्थक.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

चांदवड : तालुक्यातील बहुचर्चित व प्रतिष्टेच्या वडाळीभोई ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव गट) उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर, कारभारी आहेर, प्रदीप आहेर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने थेट सरपंच पदासह १६ जागांवर दणदणीत विजय मिळवीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सत्ताधारी सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे यांच्या प्रगती पॅनलला पराभवाची धूळ चारली आहे.

या विजयामुळे शिवसेनेने १० वर्षांनंतर पुन्हा एकदा वडाळीभोई ग्रामपंचायतीवर भगवा फडकविल्याने शिवसैनिकांत आनंदोत्सव बघावयास मिळाला.

हेही वाच: Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य कसा जाईल आजचा दिवस, लगेच जाणून घ्या..

वडाळीभोई(Wadalibhoi) ग्रामपंचायतीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव जाधव, निवृत्ती घाटे, नवनाथ जाधव यांनी प्रगती पॅनल, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन आहेर, कारभारी आहेर यांनी परिवर्तन पॅनल उभे करीत आवाहन दिले होते. यात थेट सरपंचपदासाठी सत्ताधारी गटाकडून सुखदेव जाधव विरुद्ध शिवसेनेचे नितीन आहेर या दोघा हेविवेट नेत्यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी केली. यामुळे सरपंचपदाची निवडणूक अधिकच चुरशीची व प्रतिष्ठेची बनली होती. नितीन आहेर यांनी ३२६४ मते घेत घवघवीत विजय मिळविले. निकाल ऐकताच नितीन आहेर यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष साजरा केला. यावेळी कारभारी आहेर, चंद्रकांत आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर, संदीप उगले, गुड्डू खैरनार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राज्य सरकारचा हा मोठा निर्णय, मतदानावर काय होणार परिणाम…

राष्ट्रवादीला धोबीपछाड देत बेट सरपंचपदासह १६ जागांवर दणदणीत विजय

शिवसेनेचे(Wadalibhoi) विजयी उमेदवार व मते

संतोष जाधव (३८८), अनुराधा आहेर (४३७), दत्तू गांगुर्डे (७४३), अलका गांगुर्डे (७४४), रेखा आहेर (६९४), किरण जाधव (७११), लक्ष्मी गांगुर्डे (७६८), भारती जाधव (७११), जयराम भोसले (६००), अरुण आहेर (७०५), सुनीता निरभवणे (६१२). ज्ञानेश्वर जाधव (३४५), सुजाता जाधव (३०४), शांताराम जाधव (२९३), आशा आहेर (३११), सारिका जाधव (२२५).