श्रीराम शेटे यांचा आज अभीष्टचिंतन सोहळा

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

दिंडोरी : राष्ट्रवादी ‘काँग्रेसतर्फे ‘वेध भविष्याचा विचार राष्ट्रवादीचा’ या कार्यक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. ५) सकाळी ९.३० वाजता ओमसाई लॉन्स, परमोरी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, रा. यु. कॉ. तालुकाध्यक्ष शाम हिरे यांनी दिली. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा दि. ५ डिसेंबर रोजी वाढदिवस असून, `त्यानिमित्त त्यांचा अभीष्टचिंतन सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला आहे.आमचा दिंडोरी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, गणपत पाटील, दत्तात्रय पाटील, पक्षनिरीक्षक जगदीश पवार आदी मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, रा. यु. काँ. तालुकाध्यक्ष शाम हिरे यांनी केले आहे.