
Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.
मुंबई : समान नागरी कायदा असा महाराष्ट्रात आणता येत नाही. देशात आणता येतो. एका राज्यासाठी कायदा नसतो. हा कायदा देशभरात लागू करण्याचे केंद्र सरकार ठरवते. त्यानंतर कायदा राज्यांना लागू होतो. हा कायदा आला पाहिजे, ही आमची पहिल्यापासूनची मागणी असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे हे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. पक्षबांधणीच्या निमित्ताने त्यांचा हा दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुखांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, ते बाहेर पडले म्हणून माझ्या पोटा गोळाबिळा काही आलेला नाही. माझ्या पोटात गोळा कशाला येईल? असा सवालही त्यांनी केला. इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांना सहजच भेटलो. इतिहासावर चर्चा झाल्या. त्यांचे आशीर्वाद मिळणे ही मोठी गोष्ट आहे. त्यांना माझा स्पष्टवक्तेपणा, रोखठोक स्वभाव आवडला. अशांकडून खूप शिकण्यासारखे आहे. जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे. सध्या इतिहास जातीतून पाहण्याचे पेव फुटले असल्याचे ते म्हणाले.
(बॉक्स) राज ठाकरे-नितेश राणे भेट राज ठाकरे सावंतवाडीमध्ये आले होते. नितेश राणेही सावंतवाडीमध्ये होते. त्यामुळे या दोघांची तेथील एका हॉटेलमध्ये भेट झाली. सुमारे 20 मिनिटे त्यांच्यामध्ये चर्चा झाली. नितेश राणे यांना याबाब विचारले असता त्यांनी अधिक बोलणे टाळले. ही कौटुंबिक भेट होती. यावर मला आणखी काही बोलायचे नाही.