गोदावरीवरील वादग्रस्त पूल हिवाळी अधिवेशनात गाजणार

Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.

नाशिक : पुरप्रभाव क्षेत्र वाढण्यास कारणीभूत ठरू शकणारा गोदावरी नदीवर प्रस्तावित वादग्रस्त पुल तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला होता. आता या पुलाच्या उभारणीचा पुन्हा घाट घातला जात असेल तर त्यास कडाडून विरोध केला जाईल.

adhiveshan Taluka Post | Marathi News

विद्यमान मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाणार असून येत्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा प्रकर्षाने सादर केला जाईल, असा इशारा भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिला आहे. त्यामुळे या पुलासाठी पुढाकार घेणारे खा. हेमंत गोडसे आणि आ. फरांदे यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीतील सदनिकाना मीटर सादी परवानगी देण्याच्या मोबदल्यात लाव स्विकारणाऱ्या वीज महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास एसीबीनेकल्या. संशयितास सतरा हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले असून, याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

गोदावरीवरील वादग्रस्त पुलाच्या उभारणीवरून नाशकातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरूवात झाली आहे. हे जेहान सर्कलपासून नरसिंहनगरमार्गाने आभाळे मळा तसेच शिंदे मळा दरम्यान ३० मीटर डी. पी. रोडवर २०.८५ कोटी रुपये, तर गंगापूर रोडवरील जुने पंपिंग स्टेशन ते मखमलाबाद या दरम्यान १४.९८ कोटी रुपये खचातून गोदावरीनदीवर पुलांची उभारणी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र, गोदावरी नदीवर गंगापूर रोड ते चांदशी, मखमलाबाद, पंचवटी परिसराला जोडणारे आनंदवली पूल, बापू पूल, फरिस्ट नर्सरी पूल, चोपडा पूल, रामवाडी पूल उभारण्यात आलेले आहेत.

सीडब्ल्यूपीआरएसच्या अहवालानुसार दीड किलोमीटर लांबीच्या गोदावरी नदीपात्रावरील या पाच या पुलांमुळे नदीच्या पूर पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरीनदीवर आणखी पुल उभारल्यास पूरपातळीत आणखी वाढून नदीकाठच्या हजारो नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत आ. फरांदे यांनी प्रस्तावित पुलाला विरोध दर्शविला होता. हा वाद तत्कालिन मुख्यमंत्री, तत्कालिन नगरविकास मंत्र्यांकडे गेल्यानंतर पुलाच्या बांधकामास स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा स्थानिक नागरिकांची गरज असल्याचा दावा करत हाच पुल पुन्हा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी खासदार गोडसे यांनी पुढाकार घेतल्याने आ. फरांदे पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या आहेत.

या पुलाला आपला विरोध कायम असल्याचे सांगत विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले. मुठभर लोकांसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असेल तर त्याविरोधात हिवाळी अधिवेशनातही मुद्दा उपस्थित केला जाईल, असा इशारा आ. फरांदे यांनी दिला.