Voting updates: आता देशात कुठूनही मतदान करता येणार…? निवडणूक आयोगाने बनवले खास मशीन..!!

Last Updated on December 29, 2022 by Jyoti S.

Voting updates: आता देशात कुठूनही मतदान करता येणार…? निवडणूक आयोगाने बनवले खास मशीन..!!

नोकरी, काम-धंद्यानिमित्त अनेक जण आपले गाव, शहर सोडून दूर राहतात. निवडणुकीच्या वेळी बऱ्याचदा या नागरिकांना मतदानासाठी येता येत नाही(Voting updates). अशा लोकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

देशातील नागरिकाला तो कुठेही असला, तरी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने ‘रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन’ (आरव्हीएम) तयार केले आहे.

16 जानेवारीला डेमो

निवडणूक आयोगाने येत्या 16 जानेवारीला या मशीनच्या डेमोसाठी राजकीय पक्षांना(Voting updates) बोलावले आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित असेल. शिवाय विविध मुद्द्यांवर आयोगाने 31 जानेवारीपर्यंत लेखी मते मागवली आहेत.हेही वाचा: Assembly updates : विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर, समितीची रचना ‘अशी’ असेल…!!

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशात 67.4 टक्के मतदान झाले होते, म्हणजेच, तब्बल 30 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘आरव्हीएम’ फायदेशीर ठरणार आहे.

Comments are closed.