
Last Updated on November 28, 2022 by Taluka Post
राज्यपाल कोश्यारी यांचे वय काय आणि ते बोलताहेत काय ? ते राज्यपाल पदावर बसलेले आहेत म्हणून मान राखतो, महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.
मुंबई : जुन्या गोष्टी उकरून महापुरुषांची बदनामी कशासाठी करता? राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना शिवीगाळ करू लागले आहेत. आपण आणखी किती खालच्या स्तरावर जाणार आहोत. तरुण पिढी आधीच राजकारणाबाबत नकारात्मक असताना ती आणखी दूर जाईल. आपण हे सर्व थांबवायला हवे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना व नेत्यांना केले आहे.
मुंबईच्या नेस्को मैदानावर रविवारी मनसेच्या आयोजित गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. या सभेत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांचे वय का आणि ते बोलताहेत काय? से राज्यपाल पदावर बसलेले आहेत म्हणून मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. मध्यंतरी ते येथील गुजराती मारवाडी परत गेले. तर काय होईल, असे बरळले. पण मी राज्यपालांना विचारतो की, तुम्ही त्या उद्योगपती गुजराती मारवाड्यांना ते महाराष्ट्रात का आले हे विचारा. त्यांच्याकडे पैसे होते तर त्यांनी त्यांच्या राज्यांत का गुंतवले नाहीत. कारण देशात दुसरीकडे उद्योगासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. आजही देश-विदेशातील गुतंवणुकीसाठी पहिली पसंती महाराष्ट्राला देतात. महाराष्ट्र हा मोठा होता आणि मोठाच आहे. महाराष्ट्र काय हे आहे आम्ही कोश्यारीकइन समजून घ्यायचे का? असे सांगत राज यांनी राज्यपालांना लक्ष्य केले.
मुंबई : जुन्या गोष्टी उकरून महापुरुषांची बदनामी कशासाठी करता? राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना शिवीगाळ करू लागले आहेत. आपण आणखी किती खालच्या स्तरावर जाणार आहोत. तरुण पिढी आधीच राजकारणाबाबत नकारात्मक असताना ती आणखी दूर जाईल. आपण हे सर्व थांबवायला हवे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना व नेत्यांना केले आहे.
मुंबईच्या नेस्को मैदानावर रविवारी मनसेच्या आयोजित गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. या सभेत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांचे वय का आणि ते बोलताहेत काय? राज्यपाल पदावर बसलेले आहेत म्हणून मान राखतोय, अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. मध्यंतरी ते येथील गुजराती मारवाडी परत गेले. तर काय होईल, असे बरळले. पण मी राज्यपालांना विचारतो की, तुम्ही त्या उद्योगपती गुजराती मारवाड्यांना ते महाराष्ट्रात का आले हे विचारा. त्यांच्याकडे पैसे होते तर त्यांनी त्यांच्या राज्यांत का गुंतवले नाहीत. कारण देशात दुसरीकडे उद्योगासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. आजही देश-विदेशातील गुतंवणुकीसाठी पहिली पसंती महाराष्ट्राला देतात. महाराष्ट्र हा मोठा होता आणि मोठाच आहे.
आंदोलनांवर एक पुस्तिका काढणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थापनेसून १६-१७ वर्षांत अनेक आंदोलने केली. लोकांच्या विस्मरणातून ते जाऊ नये म्हणून या आंदोलनांवर मी एक पुस्तिका काढणार आहे. मराठी भाषेत परीक्षा, रेल्वे भरती, पाकिस्तानी कलाकार बंदी, टोल, मशिदीवरचे भोंगे असे शेकडो विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती घेतले