Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Winter Session 2022 day-7: शेतकरी हैराण सरकार खातो गायरान.
Winter Session 2022 day-7: शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या…भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या कुणी राठोडला द्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या,भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… जनतेकडून पैसे घेणार्या अब्दुल सत्तार यांचा निषेध… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
आज अधिवेशनाचा सातवा ( Winter Session 2022 day-7)दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विधानपरिषदेच्या पूर्ण आवारातून ही दिंडी विधानसभेच्या पायर्यांवर काढण्यात आली. टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.हेही वाचा: Honey farming scheme :मधमाशा पाळा अन् ५० टक्के अनुदान मिळवा!
#हिवाळीअधिवेशन२०२२