Saturday, March 2

Pune news: पुण्यातील महत्त्वाचा उड्डाणपूल शनिवारपासून वाहतुकीसाठी बंद! अशा प्रकारे वाहतुकीत बदल केला जाईल

Last Updated on January 5, 2024 by Jyoti Shinde

Pune news

पुणे :- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पुणे शहराचा विकास झपाट्याने झाला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प पुण्यात सुरू आहेत.

पुण्यातही अनेक उड्डाणपूल आहेत. पण पुण्यातील काही उड्डाणपुलांवर नजर टाकली तर ते सध्या धोकादायक अवस्थेत आहेत आणि त्यातील एक म्हणजे साधू वासवानी उड्डाणपूल. आता या उड्डाणपुलाबाबत एक महत्त्वाचा अपडेट समोर आला असून तो पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.Pune news

पुण्यामधील साधू वासवानी हा उड्डाणपूल शनिवारपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे 

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील साधू वासवानी उड्डाणपुलाला धोका निर्माण झाल्याने शनिवारपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, परिसरातील वाहनांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आता हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा उड्डाणपूल बांधण्यात आला.Pune news

हेही वाचा: Subsidy Of Five Rupees Per Liter To Milk: दूध उत्पादकांसाठी पाच रुपये अनुदान! अनुदानाचा फायदा घेण्यासाठी हि माहिती सविस्तर वाचा.

आता या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपले असून तो वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने महापालिकेने या उड्डाणपुलावरील अवजड वाहतूक यापूर्वीच बंद केली होती. वर्षभरात अनेक प्रकारे दुरुस्तीचे प्रयत्न झाले.

मात्र हा उड्डाणपूल अजूनही कमकुवत अवस्थेत आहे, त्यामुळे त्याचा सिमेंटचा स्लॅब घसरल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, सहा जानेवारीपासून पुढील दहा ते पंधरा दिवस प्रायोगिक तत्त्वावर पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे.Pune news

या ठिकाणी वाहतुकीत बदल होणार आहे

हा उड्डाणपूल बंद केल्याने नगर रोड, कोरेगाव पार्क, बंड गार्डन, विधान भवन, मोरवाडा या भागात वाहतूक वळवण्यात येणार आहे. काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार असून, वाहतूक पोलिसांकडून याचे नियोजन करण्यात येणार आहे.