Maharashtra Kesari 2023: शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा चॅम्पियन; महेंद्र गायकवाड यांचा पराभव करून मानाची गदा जिंकली

Last Updated on January 14, 2023 by Jyoti S.

Maharashtra Kesari 2023: शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा चॅम्पियन

पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षक झाला.

६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज (शनिवारी) पुण्यात झाला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचामानाची गदा जिंकण्यासाठी महेंद्र गायकवाड(mahendra gaikwad) विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये महेंद्र गायकवाड यांचा पराभव करत शिवराज राक्षे(shivraj rakshe) विजयी झाले

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

नांदेडचा शिवराज राक्षे(shivraj rakshe) आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड(mahendra gaikwad) यांच्यातील लढतीत शिवराजने महेंद्रला एका मिनिटात चिरडून ‘महाराष्ट्र केसरी’च्या गौरवावर आपले नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनचा 8-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा 6/4 असा पराभव केला.

या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ब्रिजभूषण सिंह, भाजप मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले दोन्ही मल्ल पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. हे पैलवान वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील तालमीतील हे कुस्तीपटू आहेत.

हेही वाचा: Voting updates: आता देशात कुठूनही मतदान करता येणार…? निवडणूक आयोगाने बनवले खास मशीन..!!