Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
Pune pimpari: गृहमंत्री साहेब आमच्या पुण्याकडे लक्ष द्या बघा व्हिडिओमध्ये काय झाला .., पुण्यातील घटनेचा व्हिडिओ बघा.
pune pimpari :पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात गेली काही दिवसांपासून काही समाजकंटक कोयता घेऊन दहशत माजविण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक यामुळे खूपच भयभीत असून अशा समाजकंटकांवर अतिशय कठोर कारवाई करणे खूपच गरजेचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास तिथे त्यांनी बराच गोंधळ केला. त्या लोकांमधील अल्पवयीन साथीदार कोयते फिरवत तिथे आला .
त्यांनी सुरवातीला रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर(Pune pimpari) कोयत्याने वार केले. यानंतर तेथील एका हॉटेलमध्ये घुसून त्यांनी एका ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला. तेथून त्यांनी पुढे रस्त्याने जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केला, यानंतर आणखी एकाच्या पाठीवर त्यांनी प्लॅस्टीकचा स्टुल फेकून जोरात मारला.
त्या दोघांनी मिळून परिसरात तब्बल २० मिनिटे गोंधळ घातला होता. सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे वडगाव हद्दीत होते. याबाबत तेथील लोकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
हेही वाचा: Rhea Kumari: अभिनेत्रीला मारण्यासाठी पतीने रचला होता कट
तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत जोरजोरात चालात होते. पोलिसांनी(Pune pimpari) बघताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील पाटील आणि इंगवले यांनी त्यांचा पाठलाग करून अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे . त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.