शेअर बाजारातील व्यवहारांसाठी ट्रेडिंग मास्टरची बॉट सेवा

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

पुणे : ट्रेडिंग मास्टर या शेअर बाजारातील व्यवहारांची सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित मास्टर बॉट ही नाविन्यपूर्ण सेवा दाखल केली आहे. याद्वारे व्यापाऱ्यांना शेअर बाजारातील खरेदी आणि विक्रीचे संकेत मिळवण्यास तसेच स्वयंचलितपणे व्यवहार करण्याची सेवा मिळते. मास्टर बॉटमुळे आर्थिक सेवांचे लोकशाहीकरण आणि ग्राहकांना त्यांची गुंतवणूक करण्यासाठी मदत करण्याकरता ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे मास्टर बॉटमुळे व्यापाऱ्यांना बाजाराचे ज्ञान मिळवण्यातही मोठी मदत होते. त्यामुळे किमतीतील अस्थिर वातावरणात जोखीम कमी करण्याबाबतही माहिती मिळते.

ट्रेडिंग मास्टर हा अत्याधुनिक तंत्रज्ञान सक्षम आर्थिक सेवा प्रदाता प्लॅटफॉर्म असून, ग्राहकांसाठी अत्यंत सहज सुलभ इंटरफेसद्वारे अत्याधुनिक व्यवहार सुविधा उपलब्ध केल्या जातात. आता मास्टर बॉट, नव्याने शेअर बाजारात येणाऱ्यांना स्वयंचलित व्यवहारांची सवय लावण्यासाठी सज्ज आहे. याबाबत मास्टर बॉटचे संस्थापक विनोद धामा म्हणाले की, बॉटमुळे वापरकर्त्यांना अगदी सुलभपणे शेअरचे व्यवहार करता येतात.

Comments are closed.