गावांच्या विकासात सरपंचांनी कृतिशील विचारांनी नेतृत्व करावे : भारती पवार

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशनाचे उद्घाटन

पुणे : राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेत गावाचा विकास सर्वांत महत्त्वाचा आहे. पंचायत ते पार्लमेंट या प्रवासात सरपंच हा लक्षणीय महत्त्वाचा घटक. सरपंच हे केवळ एक पद नाही, -सरपंच हा सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे. गावाच्या विकासात सरपंचांनी कृतिशील विचाराने कार्यरत राहिले पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने आयोजित केलेल्या एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन, नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण सोहळ्याच्या उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या तिथे. एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके, सरपंच संसदचे सहसमन्वयक प्रकाश महाले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यातील विविध जिल्ह्यांतील संयोजक, संघटकांचा नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

डॉ. पवार म्हणाल्या, गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे. सरपंचांनी गावाचे नेतृत्व करत असताना केंद्राच्या(central government) व राज्याच्या विविध योजना प्रभावीपणे समजून घेऊन गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सरपंच हे केवळ पद नाही, तर कृतिशील नेतृत्वाची अपेक्षा त्यामागे आहे. त्यातूनच गावाची प्रगती होणार आहे.

राहुल कराड म्हणाले, देशाच्या विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करायची असेल तर एमआयटीसारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे आणि अशा प्रयत्नांचे नेतृत्व करणे आवश्यक वाटले, या भूमिकेतून राष्ट्रीय सरपंच संसद हा उपक्रम सुरू केला आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय सरपंच संसद, राष्ट्रीय शिक्षण परिषद हे उपक्रम त्याचाच एक भाग आहेत. राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी प्रास्ताविक, प्रसाद सानप यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. नीलम पंडित यांनी आभार मानले. हेही वाचा:पवार,गडकरीना हीरो म्हणायच्या नादात कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना

Comments are closed.