Last Updated on December 29, 2022 by Jyoti S.
Loans for farmers: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, एका मिस्ड काॅलवर मिळणार झटक्यात कर्ज, या बॅंकेची भन्नाट योजना…!!
केंद्र सरकार शेतकऱ्यांना कर्ज(Loans for farmers), अनुदानापासून वेगवेगळ्या यंत्रांसाठी सर्वतोपरी मदत करीत आहे. बँकांनीही कृषी कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. अशातच पंजाब नॅशनल बॅंकेने एका मिस्ड कॉलवरच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
कसे मिळणार कर्ज..?
शेतकरी अतिशय सोप्या आणि माफक अटींवर अर्ज करून ‘पीएनबी’चे कृषी कर्ज (Loans for farmers)घेऊ शकतात. त्यासाठी मेसेजमध्ये फक्त Loan असं लिहून 56070 या नंबरवर पाठवावा. तसेच, 18001805555 किंवा 18001802222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन कर्ज मिळू शकते.हेहि वाचा : Maize: शेतकऱ्यानो आता सोयाबीनपेक्षा मका भारी कस ते बघा!!!
शेतकरी नेटबँकिंगद्वारेही कृषी कर्जासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी ‘पीएनबी’च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कृषी कर्जासाठी अर्ज करावा लागेल. आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पीएनबीने याबाबतची माहिती दिली आहे.