Last Updated on December 27, 2022 by Jyoti S.
Breaking News sinner : मजूर फेडरेशन निवडणूक : भुजबळ, कोतवाल, वाजे यांनी राखले वर्चस्व
Breaking News sinner : नाशिकला जेमतेम हजारांच्या आसपास असलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत लाखो मतांनी निवडून येणाऱ्या आमदारांच्या समर्थकांना यंदा चांगलेच पाणी पाजले आहे. त्यात सिन्नरचा निकाल जसा माणिकराव कोकाटे यांच्या जिव्हारी लागणारा आहे, तसाच नाशिक तालुक्यातून भाजप आमदार सीमा हिरे यांच्या दिराचा पराभवही तितकाच लाजीरवाणा असाच आहे. कोकाटेंनी आपल्याच भावाच्या विरुद्ध उमेदवाराला ताकद दिली, तर भाजपच्या माजी नगरसेवकाने स्वपक्षाच्या आमदाराच्या नातेवाइकाचा पराभव केल्याची बाब तितकीच महत्त्वाची आहे. भुजबळ यांच्या विरोधात येवल्यात दंड थोपटणारे दराडे आमदार द्वयींना मतदारांनी धोबीपछाड दिली आहे.
आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा मजूर फेडरेशनच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेव जागेवर मतदान होऊन अन्य जागा बिनविरोध निवडून देणाऱ्या सभासदांनाच यंदा निवडणुकीचे डोहाळे अधिक प्रमाणात लागल्याचे दिसून आले. त्यामुळे बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा खंडित झाली. राजेंद्र भोसले, केदा आहेर यांनी प्रारंभी निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तालुका गटांमधून फारसा हस्तक्षेप त्या-त्या तालुक्यातील स्थानिक राजकारणामुळे केला नसला, तरी जिल्हा पातळीवर राखीव असलेल्या पाच जागांमध्ये लक्ष घातले.
येवला तालुका गटातून सेनेचे आमदार किशोर व नरेंद्र दराडे या दोन्ही बंधुंनी भुजबळ यांना जखडून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशी किशोर दराडे स्वतः मतदान केंद्रावर हजर राहूनही
पराभव म्हणजेच, येवला तालुक्यात अजूनही भुजबळ यांचाच वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे.हेही वाचा: Sinner Taluka: सिन्नर तालुक्यात वाजे गटाला 7, कोकाटे गटाला 3 जागा
चांदवड तालुक्यात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांची व्यूहरचना पुन्हा कामी आली आहे. भाजपचे आमदार राहुल आहेर, आत्माराम कुंभार्डे यांनी जंग जंग पछाडूनही शरद आहेर यांचा तीन मतांनी पराभव झाला, तर कोतवाल यांनी शिवाजी कासव यांना निवडून आणले आहे. नाशिक तालुक्यातून सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे यांच्यासमोर भाजपचे माजी नगरसेवक जगदिश पाटील यांची मेहुणी शर्मिला कुशारे यांनी आव्हान उभे केले होते. त्यात पाटील यांची सरशी झाली.
या निवडणुकीचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे संपतराव सकाळे, राजाभाऊ खेमनार, राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ यांना पारंपरिक मतदारांनी पुन्हा जवळ केले असून, काही नवीन चेहऱ्यांना संधीही मिळाली आहे. त्यात नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, नितीन पवार यांचे परिश्रम आहेत. नाही म्हटले, तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी देवळाची निवडणूक एकतर्फी करून आपला दबदबा कायम ठेवला आहे.
तालुका गटातून सिन्नरला भारत कोकाटे यांची खरी लढत आमदार बंधू माणिकराव कोकाटे यांचे समर्थक दिनकर उगले यांच्याशी झाली.
Breaking News sinner अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अवघ्या दोन मतांनी भारत कोकाटे विजयी झाले असले, तरी त्यांच्या विजयामागे माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढला आहे.हेही वाच:Police Recruitment : भावी पोलिसांनो, मैदानात कस लावण्यासाठी व्हा सज्ज!
■ भरत कोकाटे सध्या उद्धव ठाकरे गटात असून, सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माणिकरावांच्या गडाला त्यांनी धडक देण्याची तयारी या निमित्ताने केली आहे.
भोसलेंना पाच जागा
राजेंद्र भोसले यांनी अप्रत्यक्ष घोषित केलेल्या पॅनलमधील संदीप थेटे, सुदर्शन सांगळे यांना पराभव पत्करावा लागला. दोन्ही महिला व अनुसूचित जाती गटातील ३ जागा भोसले यांच्या पदरात पडल्या, ही जमेची बाब म्हणता येईल.