बुद्धिबळाने संयम व नियोजनाचा मेळ शक्य, कृष्णाजी भगत; क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

Last Updated on December 4, 2022 by Taluka Post

सिन्नर, ता. 4 : खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, जीवनाला शिस्त लागते, एकाग्रता • वाढते. त्यामुळे बुद्धिबळाचा खेळ हा आवडीने नाही तर बुद्धीचा वापर करून खेळला जातो. बुद्धीच्या जोरावर आपण शिक्षण क्षेत्रात तसेच विविध खेळांमध्ये अग्रक्रम राहून आपल्या बुद्धीचा विकास व शरीराचा विकास करू शकतो तसेच संयम व नियोजन यांचा मेळ घालणारा हा खेळाचा प्रकार असल्याचे प्रतिपादन मविप्र संचालक कृष्णाजी भगत यांनी केले. मविप्र संचलित होरायझन ॲकॅडमी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

या स्पर्धेचे उद्घाटन मविप्र संचालक कृष्णाजी भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा स्पर्धेचे संयोजक श्री. खैरनार, तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष श्री. मिठे उपस्थित होते. श्री. भगत म्हणाले, की संस्था स्तरावर पदाधिकारी व शिक्षक अनेक विविध खेळांचे मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन देतात. आरोग्य धनसंपदा या वाक्यप्रमाणे सकस आहार व उत्तम व्यायाम हे जीवनाचे मुख्य सूत्र आहे. दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त असलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला. मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा यांनी तालुक्यातील सहभागी शाळा, क्रीडाशिक्षक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षिका नीता सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. क्रीडाशिक्षक श्री. उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.