सिन्नरचे सायकलपटू ‘एसआर’च्या दिशेने

Last Updated on December 6, 2022 by Taluka Post

बीआरएम स्पर्धेचा तिसरा टप्पा १७ सायकलपटूंकडून पार ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर: नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ४०० किलोमीटर बीआरएम स्पर्धेत सिन्नरच्या १७ सायकलपटू यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत वेळेपूर्वीच निर्धारित अंतर पार केले, स्पर्धेचा तिसरा टप्पा सिन्नरच्या सायकलपटू यांनी पूर्ण करत एसआर टायटलच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

नाशिक सायकलिस्टतर्फे ३ व ४ डिसेंबर रोजी ४०० किलोमीटर बीआरएम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बीआरएम ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेतली जाते. यात स्पर्धकांची मानसिक, शारीरिक क्षमतेचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी सायकलपटू ज्यांना संपूर्ण प्रवासात सायकल पंचर पासून ते सायकल रिपेरिंग चे कामे स्वतः करावी लागते. स्पर्धेत ४०० किमी टप्पा २७ तासांत पूर्ण करावा लागत असतो. यासाठी दिवस रात्र सायकल चालवून हे ही स्पर्धा पूर्ण करावी लागते.

नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत दोन महिलांसह एकूण ३८ जणांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी १७ जण सिन्नरचे होते.

Comments are closed.