सिन्नर : शिक्षक-शिक्षकेतर सेवकांसाठी आर्थिक साक्षरता शिबिर

Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.

सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये एक दिवशीय आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित कार्यक्रमाच्या करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी पाहुणे म्हणून आरबीआय मुंबई शाखा व्यवस्थापक विश्वजीत करंजकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ उपस्थित होते. याप्रसंगी राधादेवी तमंग, श्री राजेश पाटील व्यवस्थापक लीड बँक नाशिक, बँक ऑफ महाराष्ट्र सिन्नर शाखा मॅनेजर विकास चक्रवर्ती आदी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रातील बदलते प्रवाह, त्यामुळे सुरक्षित बैंकिंग व्यवहार महत्त्वाचे असल्याचे श्री विश्वजीत करंजकर यांनी विविध उदाहरणांच्या साहाय्याने पटवून दिले.आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमती राधादेवी तमंग यांनी आरबीआयची स्थापना कशी झाली, तसेच आरबीआयची कार्य याविषयी जनजागृती करून दिली. ऑनलाइन पद्धतीत कोणालाही ओटीपी किंवा आपली वैयक्तिक माहिती न देण्याचे प्रमुख त्यांनी आवाहन केले. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक विकास चक्रवर्ती यांनी बँकेतील कामकाजाविषयी माहिती दिली. फसव्या, तसेच खोटे आकर्षण दाखविणाऱ्या जाहिराती, विविध आमिष दाखविणाऱ्या लिंक यांच्याविषयी सतर्क राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ यांनी ऑनलाइन बँकिंग व्यवहारांविषयी घ्यावयाची काळजी, याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. गणेश पाटील यांनी केले.