Last Updated on December 21, 2022 by Jyoti S.
Sinnar Election : सिन्नरकरांनी अनुभवला चुरशीचा थरार; दोन्ही गटांचे दावे-प्रतिदावे
सिन्नर (Sinnar Election): तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या पाहायला मिळाल्या. १२ ग्रामपंचायतीत सर्वाधिक ग्रामपंचायतीत आपल्याच ताब्यात आल्याचा दावा आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोन्ही गटाने केला आहे. थेट सरपंच निवडणुकीत नांदूरशिंगोटे, शहा, आशापूर ग्रामस्थांनी अतिशय अटीतटीची व चुरशीची निवडणूक अनुभवली. ठाणगाव, सायाळे, कारवाडी, नांदूरशिंगोटे, कृष्णनगर येथे वाजे गटाने बाजी मारली. शहा, उजनी, पाटपिंप्री, कीर्तांगळी येथे आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी सत्ता मिळवली आहे. तर आशापूर, शास्त्रीनगर येथील नवनिर्वाचित सरपंच यांनी स्थानिक आघाडीने सत्ता मिळविल्याचे म्हटले आहे. तर वडगाव पिंगळा येथे महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून आले.
आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वाधिक चुरस आशापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दिसून आली. आशापूर ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत सुलोचना सीताराम पाटोळे यांनी द्रौपदा दशरथ पाटोळे यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव केला तर नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा दीपक बर्के यांनी लंकावती विलास सानप यांच्यावर अवघ्या ५३ मतांनी मात केली.हेही वाचा: Nashik Grampanchayat Election 2022: तुमच्या गावचा सरपंच कोण? कोणत्या पक्षाने मारली बाजी पहा एका क्लिक वर
शहा ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत लक्षवेधी ठरली यान आमदार माणिक कोकाटे समर्थक संभाजी यांनी बाजी मारली गत पंचवार्षिक निवडणुकीत संभाजी जाधव यांच्या पत्नी शुभाजी जाधव थेट सरपंच झाल्या होत्या यावेळी त्यांचे पती संभाजी जाधव थेट जनतेतून सरपंच झाले. काही गावांमध्ये कोकाटे-वाजे कार्यकर्ते एका पॅनलमध्ये होते त्यामुळे या पंचायतीत नेमकी कोणत्या गटाची सत्ता सांगणे अवघड होऊन बसले.शास्त्रीनगर व आशापूर येथील सरपंचांनी स्थानिक आघाडी असल्याचे सांगून दोन्ही गटाकडून तटस्थ भूमिका घेतली वडगावपिंगला येथील जेकोटाचे काही कार्य एकत्र असल्याचे दिसून आले. वाजे आपल्या ताब्यात सात ग्रामपंचायतीत आपले वर्चस्व आटले आहे. तर गटाने आपल्याकडे ६ ग्रामपंचायती आल्या असून एका ठिकाणी स्थानिक आघाडी असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Sinner solar power :सिन्नरच्या १७ गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
सायाळेत वाजे समर्थकांची बाजी
सिन्नर(Sinnar Election) तालुक्याच्या पूर्व भागातील आमदार माणिकराव कोकाटे यांचे वर्चस्व असलेल्या सायाळे ग्रामपंचायतीत माजी आमदार वाजे गटाने बाजी मारली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत वाजे गटाने ९ पैकी ८ सदस्यपदाच्या जागा जिंकल्या तर थेट सरपंच निवडणुकीत युवा कार्यकर्ते विकास शेंडगे हे २४४ मतांनी विजयी झाले. याठिकाणी धक्कादायक सत्तापरिवर्तन झाले.