सिन्नर: शहा वीज केंद्रातून वावी, पाथरे उपकेंद्राला उच्चदाब वाहिनी

Last Updated on December 3, 2022 by Taluka Post

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील विजेची समस्या मार्गी लावण्यासाठी वावी वीज उपकेंद्राच्या आवारात शेतकऱ्यांनी उपोषण केल्यानंतर शहा वीज केंद्रातून वावी व पाथरे उपकेंद्रांना उच्च दाववाहिनी टाकण्याचा प्रस्ताव वीजवितरण कंपनीने पालकमंत्र्यांकडे पाठवला. या प्रस्तावाला पालकमंत्री दादा भुसे यांनी मंजुरी दिल्याने सिन्नरच्या पूर्व भागातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शहा येथील १३२ केव्ही क्षमतेच्या वीज केंद्रातून वावी उपकेंद्रासाठी ३३ केव्ही ११ किलोमीटर लांबीची नवीन उच्चदाब वीजवाहिनी टाकण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि अधीक्षक अभियंता यांनी संयुक्तपणे मंजुरी दिली.

?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

हे काम मार्गी लागल्यानंतर वावी,पाथरे उपकेंद्रातील २८ गावांची वीज समस्येतून होणार कायमस्वरूपी सुटका होणार आहे.वावी उपकेंद्रासमोर या उच्चदाब वाहिनीच्या कामास मंजुरी मिळावी, पूर्व भागास अखंडीत वीजपुरवठा व्हावा, या मागणीसाठी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी तीन दिवस उपोषण केले. पूर्व भागातील वीज समस्या मार्गी लागावी, यासाठी . दर्शिरापरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर, वडांगळीचे माजी सरपंच योगेश घोटेकर, फुलेनगरचे नितीन अत्रे,कहांडळवाडीचे दत्ता पवार आदींसह शेतकरी तीन दिवस उपोषणाला बसले होते. त्या उपोषणाचे गांभीर्य आमदार माणिकराव कोकाटे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आपल्याकडे प्रस्ताव येताच त्यास तत्काळ मंजुरीचे आश्वासन दिले होते.

महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी तत्परतेने १३२ केव्ही शहा उपकेंद्रातून वावी उपकेंद्रास जोडणाऱ्या ३३ केव्हीए उच्च दाब वाहिनीचा परिपूर्ण प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांच्या स्वाक्षरीने बुधवारी पालकमंत्र्यांकडे सादर केला.

३३ केव्ही नवीन वाहिनी

१३२ केव्ही शहा केंद्रातून ११ किमी ३३ केव्ही नवीन वाहिनी करण्याकरता एक कोटी ४५ लाख रुपयांचे काम महावितरणकडे प्रस्तावित करण्यात आले होते.

महावितरणच्या कृषी धोरण २०२० एसीएफ फंडअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतकडून एकत्रितपणे वसूल झालेल्या रकमेच्या ३३ टक्के रक्कम गाव, तालुका आणि जिल्हा अंतर्गत येणाऱ्या महावितरणच्या दादा भ कामासाठी वापरण्यात येणार आहे.

या रकमेस मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्री आणि महावितरणचे येताच ● अधीक्षक अभियंता यांना आहेत. अधीक्षक अभियंत्यांनी सदर कामाचा आश्वास प्रस्ताव करून अंतिम टिपणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना सादर केला होता. कार्यका त्यावर भुसे यांनी मंजुरी दिली.