Last Updated on December 24, 2022 by Taluka Post
Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर(Sinnar Nagar Parishad) : कोरोनानंतर फेरीवाले व उद्योग व्यावसायिकांना कर्ज मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांतून १८ वैयक्तिक व्यावसायिकांसह १२ बचतगटांना कर्जमंजुरी देण्यात आली. सिन्नर नगर परिषद कार्यालयात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय केदार यांचे मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. त्यात सदर कर्जमंजुरी देण्यात आली.
शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, बैंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक विश्वनाथ चक्रवर्ती, बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी, युनियन बँक आॅफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक अमोल अमृतकर आशिष कुमार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश चौधरी, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक भूषण पाटील, उन्नती शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा निलोफर सय्यद यांचे प्रमुख उपस्थित बैठक पार पडली.
यावेळी स्वयंरोजगार या घटकाद्वारे कर्ज प्रस्ताव कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. १८ वैयक्तिक उद्योग व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना १८ लाख रुपये कर्जाची मंजुरी देण्यात आली. तसेच महिला स्वयंसहायता बचत गटाद्वारे उद्योग व्यवसाय करणाऱ्या १२ बचत गटांना २४ लाख रुपये बँक कर्ज मंजूर करण्यात आले. कोरोना काळात हाताचा व्यवसाय बंद झालेल्या फेरीवाले यांस त्यांचा व्यवसाय पुन्हा चालू करता यावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना आणली असून सदर योजनेअंतर्गत प्रथम कर्ज १० हजार, द्वितीय कर्ज २० हजार व तृतीय कर्ज ५० असे विनातारण कर्ज दिल्या जात आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त फेरीवाले बांधव यांनी लाभ घ्यावा तसेच प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना व दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत वैक्ि बचत गटाचे कर्ज प्रस्ताव मंजूर करून सर्व बँक व्यवस्थापक यांनी लवकर कर्ज वितरित करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी अनुराधा लोंढे, नीशा कापुरे, प्रतिभा भाटजिरे यांच्यासह सचिव उपस्थित होत्या.
हेही वाचा: Sinner Dubere: डुबेरे येथे राष्ट्रीय गणितदिनी प्रतिमापूजन